
जालंधरः पंजाबचे माजी मुख्यमंत्री ( ) हे लवकरच नवीन राजकीय पक्ष स्थापन करतील, अशी दाट शक्यता आहे.. या पक्षाचे नाव (PVP) असेल. पक्षाची घोषणा करण्यापूर्वी अमरिंदर सिंग यांनी आपल्या जवळच्या नेत्यांशी संपर्क साधला आहे. तसंच नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधकांनाही या नव्या पक्षात सहभागी केलं जाणार आहे, असं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येत आहे. अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवल यांची भेट घेतली. आपण काँग्रेसमध्ये राहणार नाही आणि भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं दिल्ली दौऱ्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं होतं. अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धूंवर जोरदार हल्ला चढवला होता. कुठल्याही परिस्थिती सिद्धूंना निवडणुकीत जिंकू देणार नाही, असा पण त्यांनी केला आहे. सिद्धूंना पराभूत करण्यासाठी त्यांच्याविरोधात मजबूत उमेदवार उभा करणार, असं ते म्हणाले होते. या वक्तव्यानंतर अमरिंदर सिंग हे लवकरच नवीन पक्ष स्थापन करतील, असं बोललं जातंय. अमरिंदर सिंग हे सध्या आपल्या निकटवर्तीय नेत्यांना भेटून हा नवीन पक्ष स्थापन करत आहेत. यामध्ये मंत्रिमंडळातून बाहेर केलेल्या त्यांच्या जवळच्या मंत्र्यांसह, संघटनेतून बाजूला करण्यात आलेले नेतेही सहभागी होतील. यानंतर सिद्धूंवर नाराज असलेले नेत्यांना पक्षात सहभागी केले जाईल. निवडणूक जवळ आल्यावर अमरिंदर सिंग यांच्या निकटवर्तीयांना तिकीट कापलं जाणार हे निश्चित मानलं जातंय. यामुळे उमेदवारीची दावेदारी करणाऱ्यांना सहभागी करून पक्ष बळकट केला जाईल. अमरिंदर सिंग पूर्णपणे काँग्रेसला धक्का देण्याच्या मूडमध्ये आहेत. अमरिंदर सिंग यांच्या या पावलामुळे काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग घोंगावत आहेत. कारण अमरिंदर सिंग यांचे निकटवर्ती आमदार आणि माजी मंत्री हे काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. यामुळे पंजाबमधील मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नींचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिरोमणी अकलीदलातून वेगळे झालेल्या अकाली दलाने अमरिंदर सिंग यांना ऑफर दिली आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलन संपवण्यावर अमरिंदर सिंग यांच्या पक्षाचा फोकस असेल. या पक्षाच्या माध्यमातून अमरिंदर सिंग हे कृषी सुधारणा कायद्यांनाविरोध करतील. मुख्यमंत्री असताना अमरिंदर सिंग यांनी आधीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आणून अमरिंदर सिंग राज्यात आपल्या पक्षाचा दबदबा निर्माण करून शकतात. यामुळेच अमरिंदर सिंग हे शेतकरी संघटनांच्या नेत्यांशीही संपर्कात आहेत.