आंबेडकरांच्या गैरहजेरीत वंचितने अकोला कसे जिंकले?; अशी पलटली बाजी! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 7, 2021

आंबेडकरांच्या गैरहजेरीत वंचितने अकोला कसे जिंकले?; अशी पलटली बाजी!

https://ift.tt/3aaVvNA
अकोला: जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यांच्या ' 'ने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. जिल्हाा परिषदेच्या १४ गटांकरिता तर पंचायत समितीच्या २८ गणांकरिता ही निवडणूक घेण्यात आली होती. करोना संसर्गामुळे लांबलेली निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी, विशेषत: आमदारांनी गंभीरपणे घेतली होती. ( ) वाचा: अकोला जिल्ह्यातील सर्व निकाल लागले आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या १४ जागांपैकी सहा जागा वंचित बहुजन आघाडीला मिळाल्या असून, काँग्रेस, शिवसेना , प्रहार व भाजप यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या तर दोन अपक्ष उमेदवारसुद्धा या निवडणुकीत विजयी झाले आहेत. पंचायत समितीच्या अठ्ठावीस जागांपैकी १६ जागा वंचितने मिळवल्या असून, शिवसेनेला पाच, भाजपला तीन तर काँग्रेस, एमआयएम व अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. वाचा: या निवडणुकीत पहिल्यांदाच पालकमंत्री यांच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उभ्या असलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषदेमध्ये एक व पंचायत समितीमध्ये एक, अशा जागा प्राप्त झाल्या आहे. पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला २८ पैकी १६ जागा मिळाल्याने त्यांना कुणाचीही मदत न घेता सत्ता स्थापन करता येणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये मात्र त्यांना दोन जणांचा आधार घ्यावा लागणार आहे. गेल्या वेळेसारखं दोन अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेमध्येही वंचित आपली सत्ता पुन्हा स्थापन करू शकते. अकोट तालुक्यातील कुटासा या मतदारसंघात विधानपरिषदेचे आमदार यांच्या उमेदवाराचा पराभव झाला असून तिथे प्रहार पक्षाच्या उमेदवार स्फूर्ती गावंडे विजयी झाल्या आहेत. कुटासा येथील राष्ट्रवादीची जागा अमोल मिटकरी यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यातून मतदानाच्या दिवशी पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप सुद्धा केला होता. मात्र तरीही अमोल मिटकरी यांच्या उमेदवाराचा पराभव झाला असून, तिथे प्रहार ने आपली जागा निश्चित केली आहे. या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्ष पहिल्यांदाच जिल्हा परिषद परिषद व पंचायत समितीमध्ये दाखल झाला असून प्रहारने आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केलं आहे. पुंडकरांची रणनीती मागील तीन महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आजारी असल्याने जिल्ह्यात अनुपस्थित होते. त्यामुळे अकोल्यातील वर्चस्व राखण्याचे मोठे आव्हान वंचितपुढे होते. या स्थितीत अकोला जिल्ह्याची निवडणुकीची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांभाळली आणि बाजीही पलटवली. पुंडकर यांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावून वंचितचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवलं आहे. पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर जिल्ह्यात एवढ्या जास्त दिवस अनुपस्थित होते. मात्र तरीही वंचितने आपला दबदबा कायम ठेवला आहे. वाचा: