
सांगली : 'ईडीबाबत खासदार बोलले ते खरं आहे. , प्राप्तीकर खात्याच्या चौकशीच्या भीतीनं अनेकजण भाजपमध्ये गेले. जे भाजपात गेले त्यांना संरक्षण दिलं जात आहे. सत्तेचा कसा दुरुपयोग होतो याचं वर्णनच भाजपच्या खासदारांनी केलं आहे,' असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री (NCP ) यांनी लगावला आहे. समीर वानखेडे यांनी कागदपत्रे लपवून सरकारची फसवणूक केली असेल तर, हा प्रकार गंभीर असल्याने त्यांची चौकशी होईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. 'मी भाजपचा खासदार असल्यामुळे मला ईडीची भीती नाही. आमच्या मागे ईडी लागत नाही,' असं वक्तव्य सांगलीतील भाजपचे खासदार संजय पाटील यांनी केले. याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. दुसरीकडे, मुंबईतील ड्रग्स पार्टी प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी समीर वानखेडे संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, ड्रग्ज प्रकरण मिटवण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी होते, हा प्रकार गंभीर आणि लोकशाहीला घातक आहे. भाजपचे काही समर्थक यात असल्याचं दिसत आहे. समीर वानखेडे यांनी कागदपत्रे लपवून सरकारची फसवणूक केल्याचं बोललं जात आहे. याबाबत त्यांची चौकशी होईल, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.