सचिन सावंत यांचा पदाचा राजीनामा; नाना पटोले म्हणतात... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 21, 2021

सचिन सावंत यांचा पदाचा राजीनामा; नाना पटोले म्हणतात...

https://ift.tt/3DYtC8n
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः 'जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी ईडीसारखे प्रकार केले जात आहेत. ईडी हा विषय आता नेहमीचा झाला आहे. त्यामुळे त्याला घाबरण्याचे कारण नाही', असे आवाहन यांनी बुधवारी मुंबईत केले. 'या सर्व प्रकाराला काँग्रेस घाबरणार नाही. आम्ही जनतेच्या प्रश्नावर केंद्र सरकारविरोधात लढत राहू', असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. नांदेडमधील बड्या नेत्यावर ईडीची कारवाई होण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच दिले. या संदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी कार्यकर्त्यांना वरील आवाहन केले. केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवत पटोले म्हणाले, 'स्विस बँकेत काळा पैसा वाढला आहे. हे पैसे भाजपच्या लोकांचे आहेत काय? अमित शहा यांच्या मुलाचे उत्पन्न एका वर्षात नऊ हजार पटीने वाढले असेल, तर पंतप्रधानांच्या बाजूला बसणाऱ्या शहा यांनाच भीती वाटायला हवी', असा टोलाही त्यांनी लगावला. 'सावंत यांची नाराजी दूर करू' प्रदेश काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची नियुक्ती झाल्याने नाराज असून, त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात नाना पटोले यांच्याकडे विचारणा केली असता, 'त्यांच्याशी चर्चा करून नाराजी लवकरच दूर करू', असे ते म्हणाले.