१८४ कोटींची छुपी मिळकत; प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात धक्कादायक वास्तव उघड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 16, 2021

१८४ कोटींची छुपी मिळकत; प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात धक्कादायक वास्तव उघड

https://ift.tt/2YRUJDm
म. टा. प्रतिनिधी, मुंबई प्राप्तिकर विभागाने मागील आठवड्यात पाच दिवस महाराष्ट्रासह अन्य तब्बल ७० ठिकाणी कसून तपास केला. त्यामध्ये १८४ कोटी रुपयांची छुपी मिळकत उघड झाली. यांच्याशी संबंधित कंपन्यांचा हा तपास होता, असे प्राप्तिकर विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. प्राप्तिकर विभागाने प्रामुख्याने दोन रिअल इस्टेट उद्योगांचे कार्यालय, घरे व त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर हे छापे होते. मुंबई, पुणे, बारामती, गोवा व जयपूर येथे हा छापा टाकण्यात आला. यामध्ये छुपी मिळकत, बेनामी व्यवहार आदी मोठ्या प्रमाणात बाहेर आले असून, अशा बेनामी व्यवहारांचा आकडा १८४ कोटी रुपये होता. या दोन रिअल इस्टेट समूहाने बनावट भागीदारी प्रीमियम, संशयास्पद बेनामी कर्ज वितरण, सेवा न घेतलेल्या कामाच्या बनावट पावत्या, बनावट व्यवहार आदींद्वारे ही मिळकत लपविण्यात आली. या सर्व बेनामी मिळकतीत राज्यातील एका प्रभावशाली कुटुंबाचा समावेश आहे, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. ही सर्व १८४ कोटी रुपयांची छुपी विविध मालमत्ता खरेदीसाठी उपयोगात आणली गेली. त्यामध्येच मुंबईतील आलिशान भागातील टोलेजंग इमारतीतील कार्यालय, दिल्लीतील आलिशान भागातील फ्लॅट, गोव्यातील रिसॉर्ट, महाराष्ट्रातील शेतजमीन तसेच साखर कारखान्यातील गुंतवणुकीचाही समावेश आहे. या सर्व मालमत्तांचे मूल्य १७० कोटी रुपये आहे. याच छाप्यादरम्यान २.१३ कोटी रुपयांची रोख व ४.३२ कोटी रुपयांचे दागिनेदेखील जप्त करण्यात आले. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.