मुंबईः 'शरद पवार () यांनी स्पष्टपणे सांगितलं भाजपला सत्तेचा माज आला आहे. पवार यांनी वैयक्तिक टीका केली नाही. पण भाजपच्या (Chandrkant Patil) यांनी पवार यांचा एकेरी भाषेत उल्लेख करुन आपल्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचे दाखवून दिले,' अशा खोचक शब्दांत शिवसेनेनं (Shivsena) भाजप व केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर आलं आहे. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेनंही यावरुन चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात आज शिवसेनेनं भाजपला खडे बोल सुनावले आहेत. 'भाजपा व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत. राजकारणाचा हा नवा ‘पदर’ बरेच काही सांगून जातो. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच या कल्पना त्यांना सुचत असाव्यात. दसरा मेळावा, त्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण वाया गेले नाही. ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरून स्पष्ट होते,' अशी टीका शिवसेनेनं केली आहे. वाचाः 'महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर हल्ला करणे समजू शकतो, पण त्यांच्या कुटुंबाचाही छळ करून भाजपावाले स्वतःचा अमानुष चेहराच दाखवीत आहेत. ‘पदरा’आडचे नवे घाणेरडे राजकारण सुरू आहे. पडद्यामागे पूर्वी बरेच काही घडत असे. आता पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर भाजपने सुरू केला आहे. आपल्या देशात हे नवे पायंडे भाजपाने पाडले आहेत. भाजपाने महाराष्ट्राची सत्ता गमावून दोन वर्षे झाली. त्या धक्क्यातून त्यांनी सावरायला हवे. जे घडले आहे ते स्वीकारून पुढे जायला हवे. राजकारणात हे असे चढ-उतार येतच असतात,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचाः