उद्धव ठाकरे यांचे धारदार भाषण; भाजपवर 'असा' हल्ला कधीच केला नाही! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 16, 2021

उद्धव ठाकरे यांचे धारदार भाषण; भाजपवर 'असा' हल्ला कधीच केला नाही!

https://ift.tt/3pbhPzl
मुंबई: मुख्यमंत्री व पक्षप्रमुख यांची तोफ बऱ्याच काळानंतर धडाडली. दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून ठाकरी शैलीत त्यांनी जुना मित्रपक्ष आणि केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले. जवळपास तासभर उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यात हिंदुत्व, ड्रग्ज प्रकरण, लखीमपूर खेरी हिंसाचार या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ( ) वाचा: उद्धव ठाकरे यांनी धारदार भाषण केले. हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी सातत्याने विधाने करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांनी पुन्हा एकदा ललकारले. हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हान देतानाच राज्यातील सरकार भक्कम आहे, असे सांगण्याचाच त्यांनी प्रयत्न केला. वाचा: उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे... -भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा, मराठी-अमराठी भेद गाडून हिंदूंचीही एकजूट बांधा. 'हिंदू तितुका मेळवावा, हिंदुस्थान धर्म वाढवावा.' - समाजसेवा, हिंदुत्व रक्तात असावं लागतं. रक्तपिपासूपणा नव्हे तर रक्तदान करणं हासुद्धा धर्म आहे. ज्यांचे जीव वाचवू शकतोय त्यांना आम्ही रक्त देतोय. - तुमच्या पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी या शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही. देव, देश आणि धर्मासाठी या शिवसैनिकाचा जन्म झालेला आहे. - पुढच्या महिन्यात आपल्या हक्काच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील. फोडण्याचे अनेक प्रयत्न केले, पाडण्याचे प्रयत्न केले, मी तर आज पण सांगतो, हिंमत असेल तर पाडून दाखवा.. - आता हिंदुत्वाला धोका आहे तो या उपटसुंभांपासून, नवहिंदुंपासून. जेव्हा खरंच हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द, एकमेव हिंदुहृदयसम्राट हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभे राहिले होते. - कोणाच्या तरी आडून हल्ले करायचे आणि मग तो मी नव्हेच म्हणायचे. याला नामर्दपणा म्हणतात. - हर हर महादेव म्हणजे काय असतं हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये पण आलीच तर दाखवावचं लागेल. - आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं हे नामर्दाचं लक्षण आहे, मर्दाचं नाही आणि हिंदुत्वाचं तर मुळीच नाही - मी टीकाकारांसाठी बोलत नाही. मी तुमच्यासाठी बोलतो आहे, माझ्या जनता जनार्दनासाठी बोलतो आहे, माता भगिनींसाठी बोलतो आहे. आपला वाडा चिरेबंदी आहे. टीकाकारांची मी पर्वा करत नाही. - नेहमी नम्रपणे जनतेचे आशीर्वाद मिळवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि हे आशीर्वादच खरे वैभव आहे, खरी ताकद आहे. हे जोर जबरदस्तीने मिळत नसतात, ते कमवावे लागतात. ती कमावण्याची परंपरा मिळालेली आहे आपल्याला. - माझ्या जनतेला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीही वाटतं कामा नये. मी तुमच्या घरातला माणूस आहे, तुमचा भाऊ आहे, असं वाटो ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. - हर्षवर्धन पाटील भाजपात का गेले हे त्यांनीच सांगितले आहे. अशी लोकं भाजपाची ब्रँड अँबेसेडर झाली आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपात आले म्हणून पवित्र झाले का? गटाराचं पाणीही भाजपात शुद्ध होतं का? - आधी पंढरपूर आणि आता देगलूर. दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीत यांना पक्षातून उमेदवार मिळाला नाही. हे उपरे उमेदवार घेतात आणि भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणतात! - विरोधी विचाराचं सरकार आहे म्हणून महाराष्ट्राकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. हा नतद्रष्टपणा आहे. महाराष्ट्र पुढे जात असल्याचं पाहून पोटात दुखतंय. त्यामुळेच महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. - महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे तर उत्तर प्रदेशात काय लोकशाहीचा मळा फुलला आहे काय? - केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी निधी गुजरातला वळवण्याचा फतवा काढला. माहिती अधिकारात अनेक गैरप्रकार उघडकीस आले. देशातील ११ बंदरांचा सीएसआर फंड गुजरातकडे वळवला गेला आहे. वाचा आणि थंड बसा, असेच म्हणण्याची वेळ आलीय. वाचा: