कॅबची जागा बदलल्याने मुंबई विमानतळावर गोंधळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 23, 2021

कॅबची जागा बदलल्याने मुंबई विमानतळावर गोंधळ

https://ift.tt/3GdNAhn
म. टा. प्रतिनिधी,मुंबई पकडण्याची जागा बदलल्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री गोंधळ उडाला. काही प्रवाशांना याबाबत माहिती नसल्याने त्यांची धावपळ झाली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल (टी २) इमारतीत एकूण आठ पोटमाळे आहेत. ते एकूण चार मजल्यांवर आहेत. त्यापैकी दुसऱ्या मजल्यावर आगमन, तिसऱ्या मजल्यावर देशांतर्गत प्रस्थान व चौथ्या मजल्यावर आंतरराष्ट्रीय प्रस्थानाची सोय आहे. याआधी दुसऱ्या मजल्यावर आगमन होणाऱ्या प्रवाशांसाठी सातव्या पोटमाळ्यावरून खासगी कॅबची सोय होती. मात्र विमानतळ प्रशासनाने गेल्या महिन्यात कॅब घेण्यासाठीची सोय सातव्यावरून चौथ्या पोटमाळ्यावर हलवली. त्यामुळे काही प्रवाशांचा गोंधळ उडाला. अनेकांना कॅबची जागा बदलल्याची माहिती नव्हती. त्यामुळे त्यांची दोन पोटमाळ्यांदरम्यान चांगलीच धावपळ झाली.