भावना गवळींच्या निकटवर्तीय सईद खानला न्यायालयीन कोठडी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 6, 2021

भावना गवळींच्या निकटवर्तीय सईद खानला न्यायालयीन कोठडी

https://ift.tt/3iA80qL
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेनेच्या खासदार यांचा निकटवर्तीय सईद खानला विशेष पीएमएल न्यायालयाने मंगळवारी १८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भावना गवळी, व अन्य व्यक्तींविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवल्यानंतर सईदला २८ सप्टेंबरला अटक केली. कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सईद हा भावना गवळी यांच्याशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये संचालक आहे. पूर्वी विश्वस्त संस्था असलेली ही संस्था नंतर कंपनीत रूपांतरित करण्यात आली आणि त्यावर भावना गवळी यांच्या आई शालिनी व सईद यांना संचालक बनवण्यात आले. कंपनी निबंधकांकडे बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली आणि या कंपनीच्या माध्यमातून पैशांचा अपहार करण्यात आला, असा ईडीचा आरोप आहे. आपल्या स्वीय सहाय्यकाने संस्थेत कोट्यवधींचा अपहार केला आहे, अशी पोलिस तक्रार भावना गवळी यांनीच गेल्या वर्षी मे महिन्यात वाशिममधील पोलिसांत दिली होती. त्या आधारावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळी यांना लक्ष्य केले होते. गवळी यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा प्रश्न उपस्थित करत सोमय्या यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली आणि गवळी व सईद यांच्याविरोधातच गुन्हा नोंदवला. दरम्यान, या प्रकरणात ४ ऑक्टोबरला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याकरिता ईडीने समन्स बजावले असताना भावना यांनी १५ दिवसांची मुदत मागणारे पत्र पाठवले. त्यामुळे त्यांची चौकशी कधी होणार, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.