वाडा कोलम तांदळाला मिळाले जी. आय. मानांकन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 15, 2021

वाडा कोलम तांदळाला मिळाले जी. आय. मानांकन

 


वाडा कोलम तांदूळ पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात उत्पादित केला जातो या जातीच्या तांदळाला जी.आय. टॅग देण्यात आला आहे, हा सप्टेंबर (२०२१) महिण्यात मुंबईतया संदर्भातली बैठक होऊन वाडा कोलम  तांदळाला जी. आय. टॅग देण्यात आला. 

हा तांदूळ प्रामुख्याने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आणि  जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यात तसेच खोडाळा, सूर्यमाळ, कोचाळे व ईतर गावा मध्ये उत्पादित केला जातो. पालघर जिल्ह्यातील असे काही तालुक्यात ५० ते ७० % शेतकरी या तांदळाच्या जातीच्या लागवड करतात.

हा तांदळाला विदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे तसेच मोठ्या बाजारपेठांमध्ये देखील ६० ते ७० रुपये प्रति किलो सध्या उपलब्ध आहे.