मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याची 'बेनामी' गुंतवणूक; सोमय्यांच्या आरोपाने खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 17, 2021

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याची 'बेनामी' गुंतवणूक; सोमय्यांच्या आरोपाने खळबळ

https://ift.tt/3FWm7AL
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या विविध नेत्यांवर गैरकारभाराचे आरोप करणारे भाजप नेता यांनी आता थेट मुख्यमंत्री यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याची बेनामी कंपन्यांत गुंतवणूक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून याबद्दल मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागेल, असे ते म्हणाले आहेत. प्राप्तिकर विभागाने ९ दिवस टाकलेल्या छाप्यांचा दुसरा अहवाल येणे बाकी आहे. हे एक हजार कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार असून यात १५ सहकारी, पत्नी, मुलगा, बहीण यांच्या नावाखाली घोटाळा करण्यात आला आहे, असा दावा अजित पवारप्रकरणी सोमय्या यांनी केला. सुनेत्रा पवार या दोन डझन कंपन्यांमध्ये संचालक तर तीन डझन कंपन्यांमध्ये भागधारक, मालक आहेत. बहिणी, मुलगा, यजमान त्यांचा मुलगा यांच्या नावेही बेनामी कंपन्या आहेत. हे आधी एक होल्डिंग कंपनी तयार करतात, मग त्याच्या अंतर्गत कंपन्या करतात. सरकारी मालमत्ता कवडीमोल दरात विकत घेतात. जरंडेश्वर कंपनी यांचीच आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांचीच आहे. पदाचा दुरुपयोग करून त्यांनी हे सर्व मिळवले आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला. वाचाः सीबीआय, ईडीची कारवाई सुरूच राहणार महाविकास आघाडी सरकारचे अनेक नेते सीबीआयवर आगपाखड करत आहेत. मात्र त्यानंतरही या यंत्रणांची कारवाई सुरूच राहणार आहे, असे ते म्हणाले.