खळबळजनक! पाक, यूपीतील हॅकर्सनी केला पोलिस अधिकाऱ्याचा ईमेल हॅक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 13, 2021

खळबळजनक! पाक, यूपीतील हॅकर्सनी केला पोलिस अधिकाऱ्याचा ईमेल हॅक

https://ift.tt/3BBdIAb
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई शासकीय कार्यालये आणि खात्यांमध्ये सध्या धडकणाऱ्या एका इमेल (Email) मुळे खळबळ उडाली आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि उत्तर प्रदेशमधील हॅकेर्सनी (Hackers) सायबर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याचा इमेल हॅक करून सर्व शासकिय ईमेल आयडीवर एक फिशींग मेल डिलीव्हर केला जात आहे. यामध्ये रिपोर्ट इंटेलिजन्स डॉट पीडीएफ नावाची फाईल दिसत असून ती उघडू असा ॲलर्ट महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केले आहे. ( due to from and up and ) मुंबईतील पूर्व प्रादेशिक विभाग पोलिस ठाण्यातील अधिकारी राजेश शिवाजीराव नागवडे यांच्या नावाने असलेल्या आयडीवरून Terrorist behind JK attack, gunned down in Mumbai या विषयाचा फिशींग मेल डिलिव्हर होत आहे. सर्व शासकीय कार्यालयांच्या इमेल आयडीवर हा मेल येत असल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या पथकाने याबाबत तांत्रिक तपास केला असता पाकिस्तान आणि उत्तरप्रदेश येथून हे मेल असल्याचे दिसून येत आहे. क्लिक करा आणि वाचा- फिशींग मेलमध्ये एक पीडीएफ फाईल ॲटच करण्यात आली आहे. हा मेल, यामधील लिंक तसेच पीडीएफ फाईल डाऊनलोड केल्यास आपली सर्व माहीती, आयडी संदर्भातील सर्व तपशील हॅकर्सकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय इमेल हॅक होण्याचाही धोका आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-