मुंबई: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय झाला असून याची सुरुवात दसऱ्यानंतर करणार असल्याची माहिती काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ( ) वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे सर्व खासदार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. त्यानंतर या बैठकीतील निर्णयाबाबत नवाब मलिक यांनी माध्यमांना माहिती दिली. आगामी तीन-चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपंचायत यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची जबाबदारी मंत्र्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाच्यावतीने शिबीरे, मेळावे आयोजित करण्यासोबतच इतर तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीतील आघाडीचे निर्णय स्थानिक पातळीवर राहणार असून याबाबतची माहिती पालकमंत्री, संपर्कमंत्री आढावा घेऊन शरद पवार यांना देणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात लखीमपूर खेरी प्रकरणात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बंद पुकारला होता. यामध्ये व्यापारी, कामगार संघटना व जनतेने सहभाग नोंदवला त्याबद्दल राष्ट्रवादीच्यावतीने बैठकीत आभार मानण्यात आले. वाचा: महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दोन वर्ष होत आली आहेत. विरोधी पक्षनेतेपद हे मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी नसते, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या मानसिकतेतून बाहेर पडत विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत आले पाहिजे. हे पदही मुख्यमंत्रिपदाईतकेच महत्त्वाचे असते. या माध्यमातूनही राज्याची सेवा केली जाऊ शकते, असा टोला मलिक यांनी फडणवीस यांना लगावला. केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. या कारवाईला ठामपणे सामोरे जाणार, कोणीही डगमगणार नाही, केंद्रीय सत्तेविरोधात लढा देणार, अशी भूमिका पक्षाने घेतली असल्याचेही मलिक यांनी नमूद केले. दुकाने, हॉटेलांवरील निर्बंध कमी व्हावेत आगामी सणासुदीमध्ये दुकाने, हॉटेल यांच्यावरील करोना काळातील बंधने कमी करावीत, ही बंधने शिथील करावीत, अशी भूमिका बैठकीत एकमुखाने घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही बाब मांडली जाणार असून त्यासाठी आग्रह धरला जाणार आहे, असेही मलिक यांनी सांगितले. वाचा: