मुंबईत सेक्स टुरिझमचं रॅकेट!; 'त्या' दोघींना गोव्याला नेत असतानाच... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 20, 2021

मुंबईत सेक्स टुरिझमचं रॅकेट!; 'त्या' दोघींना गोव्याला नेत असतानाच...

https://ift.tt/3jgC7Up
मुंबई: मुंबईत ' 'चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांमुळे देहव्यापार करणे कठीण जात असल्याने तरुणींना गोव्याला नेण्यात येत होते. येथून रवाना होण्याआधीच दोन महिला दलालांना गुन्हे शाखेच्या पथकाने विमानतळाजवळ अटक केली आहे. या दोघींच्या तावडीतून देहव्यापारासाठी नेण्यात येणाऱ्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली. दोन महिला दलालांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ( ) वाचा: परिसरात राहणारी ही महिला देहव्यापाऱ्यासाठी तरुणी पुरवत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक यांना मिळाली होती. श्रीधनकर यांनी बोगस ग्राहक तयार करून अबरून हिच्याशी संपर्क साधला. ग्राहकाने दोन तरुणी पाहिजे असल्याचे सांगताच पोलिसांचे छापे पडत असल्याने मुंबईत तरुणी येण्यास तयार नाहीत, असे अबरून हिने सांगितले. त्यावेळी तरुणींना घेऊन गोव्याला जाण्याचे ठरले. एका तरुणीसाठी ५० हजार रुपये आणि तेवढेच कमिशन देण्याचे ठरले. त्यानुसार गोव्याला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुकिंग करण्यात आले. वाचा: अबरून ही तरुणींना घेऊन विमानतळावर येणार असल्याने श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला. अबरून हिच्यासोबत वर्ष परमार ही महिला देखील आली होती. पोलिसांनी सीआयएसएफ जवानांच्या मदतीने तिलाही ताब्यात घेतले. या दोघींच्या तावडीतून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका करून दोन्ही दलालांना अटक केली. या दोघींनाही सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वाचा: