Nagpur Gas Leak : नागपूरमध्ये गॅस लीक दुर्घटना, 200 मीटरचा परिसर रिकामा, 40 जण हॉस्पिटलमध्ये दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 24, 2026

Nagpur Gas Leak : नागपूरमध्ये गॅस लीक दुर्घटना, 200 मीटरचा परिसर रिकामा, 40 जण हॉस्पिटलमध्ये दाखल

Nagpur Gas Leak : नागपूरमध्ये गॅस लीक दुर्घटना, 200 मीटरचा परिसर रिकामा, 40 जण हॉस्पिटलमध्ये दाखल

गजानन उमाटे, प्रतिनिधी : नागपूरच्या गोधणी ग्रामपंचायत परिसरात गॅस लीकची मोठी दुर्घटना घडली आहे. जवळपास 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. परिसरातील लोकांना दुसरीकडे हलवलं आहे. गोधणी ग्रामपंचायत येथील वॅाटर फिल्टर प्लॅाट परिसरात क्लोरीन गॅस लीकची घटना घडली आहे. गॅस लीकमुळे जवळपास 40 लोकांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास गॅस लीक झाल्याची माहिती आहे.

(बातमी अपडेट होत आहे)