उत्तराखंडमध्ये ट्रेकिंगला गेलेल्या १७ पैकी ११ गिर्यारोहकांचा मृत्यू, २ अद्याप बेपत्ता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 23, 2021

उत्तराखंडमध्ये ट्रेकिंगला गेलेल्या १७ पैकी ११ गिर्यारोहकांचा मृत्यू, २ अद्याप बेपत्ता

https://ift.tt/3B67JSN
डेहराडूनः उत्तराखंडच्या लिमखागा खिंडीत ट्रेकिंगला गेलेल्या ११ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. एकूण १७ गिर्यारोहक ट्रेकिंगवर गेले होते. त्यापैकी ४ जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर २ जण अद्याप बेपत्ता आहेत. गिर्यारोहकांना शोधण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एसडीआरएफ) उत्तराखंडच्या उंच टेकड्यांवर अजूनही शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. एसडीआरएफच्या एका टीमने पायीच शोध मोहिम सुरू केली होती. दुसरी टीम हेलिकॉप्टरने त्यांचा शोध घेत होती. परिसरात दळणवळणाचे कुठलेही साधन नसल्याने एसडीआरएफच्या पथकांना सॅटेलाइट फोनद्वारे माहिती दिली जात होती. एसडीआरएफचे वरिष्ठ अधिकारी क्षणोक्षणी बचाव कार्याचे निरीक्षण करत होते आणि टीमना आवश्यक निर्देश देत होते. बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरू १७ गिर्यारोहकांपैकी दोन अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी हवाई दलाचे ALH हेलिकॉप्टर २३ ऑक्टोबरला पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करेल. १४ ऑक्टोबरला ट्रेकिंगवर गेले होते १४ ऑक्टोबरला १७ गिर्यारोहक उत्तरकाशीतील हर्षीलपासून लामखागाजवळील हिमालय ट्रेकिंगवर गेले होते. पण १७ ऑक्टोबरला हिमवर्षाव आणि खराब हवामानामुळे या टीममधील ११ सदस्य बेपत्ता झाले.