सुनेवर हल्ला...घराला आग...नंतर आत्महत्या; मालमत्तेच्या वादातून सासऱ्याचे टोकाचे कृत्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 14, 2021

सुनेवर हल्ला...घराला आग...नंतर आत्महत्या; मालमत्तेच्या वादातून सासऱ्याचे टोकाचे कृत्य

https://ift.tt/3lDa7vC
म. टा. वृत्तसेवा, बदलापूरः मालमत्तेच्या वादातून सुनेवर धारदार शस्त्राने हल्ला करून घराला आग लावत ७४ वर्षीय सासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी बदलापूर पश्चिमेतील शनीनगर परिसरात समोर आली. हेरंबसृष्टी गृहसंकुलात राहणारे ७०वर्षीय किसन जाधव यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाची पत्नी रूपाली जाधव ही आपल्या मुलीसोबत घरात असताना त्यांच्यात भांडण सुरू झाले. यावेळी जाधव यांनी रागात सुनेला मारहाण करीत व नंतर सुनेच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेनंतर रूपाली यांच्या मुलीने आईला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र या घटनेनंतर घरात एकटे असलेल्या जाधव यांनी भीतीपोटी संपूर्ण घराला आग लावत घरातील पंख्याला गळफास घेतला. दरम्यान जाधव यांच्या घरातून अचानक आगीचे लोट आणि धूर येत असल्याचे पाहून इमारतीतील नागरिकांनी बदलापूर अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत जाधव यांच्या घराचा दरवाजा तोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र जाधव गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली.