काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 15, 2021

काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे निधन

https://ift.tt/3AK4Czw
ठाणे: काँग्रेसचे कांती कोळी यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथील राहत्या घरीच निधन झाले. त्यांचे मृत्यूसमयी वय ७५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले- सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ठाण्याची नगरपालिका अस्तित्वात असताना कांती कोळी यांनी नगरसेवक पद भूषविले. १९८६ साली महापालिकेची स्थापना झाली. यापूर्वी सन १९८० ते १९९० या कालावधीत ते पक्षाचे सलग दहा वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. ठाणे शहरात काँग्रेस पक्ष वाढवण्यात कांती कोळी यांनी हातभार लावला. तसंच त्यांना मानणारा शहरात काँग्रेसचा एक मोठा वर्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूप खालावली होती. ते उपचारालाही साथ देत नव्हते. अखेर गुरुवारी रात्री त्यांच्या राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मावळली. दरम्यान, माजी आमदार कांती कोळी यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या घराकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने धाव घेतली होती. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.