आर्यनला पकडणारा किरण गोसावी आहे कुठे?; लूकआऊट नोटीस जारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 14, 2021

आर्यनला पकडणारा किरण गोसावी आहे कुठे?; लूकआऊट नोटीस जारी

https://ift.tt/3mQlrnD
पुणे: क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील साक्षीदार हा पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आहे. तो भारताबाहेर पळून जाण्याची शक्यता लक्षात घेत त्याच्या विरोधात पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात गोसावी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितले. ( ) वाचा: ड्रग्ज प्रकरणामुळे साक्षीदार किरण गोसावी चर्चेत आला. गोसावी हा या प्रकरणात पंच साक्षीदार होता, असे एनसीबीने स्पष्ट केले असले तरी आर्यनला पकडून आणताना गोसावी कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आर्यनसोबत त्याने काढलेला सेल्फीही व्हायरल झाला आहे. याच गोसावीवर पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने तक्रार दिली होती. गोसावी याने आपल्या फेसबुक पेजवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार आहे. त्यामुळे आता फरासखाना पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. वाचा: दिल्ली पोलीसही मागावर किरण गोसावी याने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसवले आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याचा शोध घेत असल्याचे चिन्मय देशमुख याने सांगितले. वाचा: