मुंबई: कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपी आर्यन खान यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नाव आलेली अभिनेत्री () सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो () रडारवर आहे. या प्रकरणात आज तिसऱ्यांदा तिची चौकशी होणार आहे. क्रूझवरी ड्रग्ज पार्टी दरम्यान आर्यन खान एका अभिनेत्रीच्या संपर्कात होता. ती अभिनेत्री अनन्या पांडे असल्याचं आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आलं आहे. त्यानंतर गुरुवारी एनसीबीनं अनन्याला समन्स बजावलं होतं. तिची गुरुवारी दोन तास चौकशी झाली. त्यानंतर शुक्रवारी तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. दरम्यान तिचा मोबाइल व लॅपटॉप एनसीबीनं ताब्यात घेतल्याचं समजतं. वाचा: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अनन्याची सुमारे चार तास चौकशी झाली. मात्र, त्या चौकशीतून एनसीबीच्या हाती कुठलेही ठोस पुरावे लागलेले नाहीत. त्यामुळं अनन्याला आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्ज मिळवण्याविषयी चर्चा झाली होती, असं सूत्रांकडून समजतं. 'गांजा' कुठे मिळेल? त्यासाठी काही जुगाड करता येईल का? अशी चर्चा त्यांच्यात झालेली असं व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आल्याचं सांगितलं जातं. वाचा: