
साताराः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि एनसीबीचे अधिकारी यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. समीर वानखेडे यांची एका वर्षात नोकरी घालवणार,असा इशारा नवाब मलिक यांनी दिला होता. नवाब मलिकांच्या या विधानावर आता केंद्रीय सामाजिक मंत्री यांनी एक खोचक टोला लगावला आहे. 'समीर वानखेडेंची नोकरी जातेय की मलिकांचे मंत्रीपद जातेय ते पाहूया', असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसंच, 'आर्यन खानच्या प्रकरणात पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणता येणार नाही', असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. वाचाः 'आरोप होतायंत मात्र पूर्ण चौकशी केल्यानंतर आर्यन खानसह इतरांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला आहे. याचा अर्थ असा की त्याच्या विरोधात एनसीबीकडे सबळ पुरावा आहे. त्यामुळे आरोप करणे योग्य नाही. सुशांत सिंग प्रकरणानंतर फिल्म इंडट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होतोय हे सिध्द झाले आहे. त्यामुळे पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणणे योग्य ठरणार नाही. जी माहिती मिळतेय त्याप्रमाणे कारवाई केली जातेय,' असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. वाचाः 'मनसेला सोबत घेतल्यामुळं भाजपला मोठं नुकसान होणार आहे. आमच्याशी युती केली तर त्यांचा महापौर आणि आमचा उपमहापौर होऊ शकतो,' असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. वाचाः