मुंबई: नेते यांनी आज विरोधी पक्षनेते यांची सागर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मनसे आणि युतीच्या चर्चा सुरू असतानाच फडणवीस आणि नांदगावकर यांची भेट घडल्याने या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, ही भेट वैयक्तिक कामासाठी होती आणि या भेटीसाठी यांनीच फोन केला होता, असा दावा नांदगावकर यांनी केला आहे. ( ) वाचा: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून भाजप-मनसे युतीच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आलेले आहे. आताच झालेल्या पालघर जिल्हा परिषद निवडणुकीतही हे दोन पक्ष एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर येत्या काळात राज्यात अनेक प्रमुख महानगरपालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्त्वाची बैठक घेतली. अशावेळी मनसे आणि भाजपचे दोन महत्त्वाचे नेते भेटल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. वाचा: भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीआधी बाळा नांदगावकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तिथे आमदार आशिष शेलार हेसुद्धा उपस्थित होते. या भेटीनंतर नांदगावकर यांनी वैयक्तिक कामासाठी फडणवीस यांना भेटल्याचे सांगितले. राज यांनी त्यासाठी फडणवीस यांना फोन केला होता, असेही ते म्हणाले. फडणवीस यांच्याशी युती वा अन्य बाबतीत राजकीय चर्चा झाली का, असे विचारले असता दोन राजकारणी भेटले की राजकीय चर्चा होत असतेच, असे सूचक उत्तर नांदगावकर यांनी दिले. अधिक तपशील मात्र त्यांनी दिला नाही. वाचा: