
शारजा : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आजच्या सामन्यात तीन महत्वाच्या गोष्टी साकारल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईच्या संघाने या सामन्यात सनरायझर्ह हैदाराबादवर मात केली. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हैदराबादला आज प्ले-ऑफमध्ये पोहण्याची अखेरची संधी होती. चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा कत हैदराबादच्या फलंदाजीला वेसण घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात हैदराबादला १३४ धावांवर समाधान मानावे लागले. हैदराबादच्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. फॅफ आणि ऋुतुराज यांनी यावेळी ७५ धावांची सलामी दिली. ऋतुराजने चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४५ धावांची खेळी साकारली. ऋतुराज बाद झाल्यावर ठराविक फरकाने चेन्नईच्या संघाला एकामागून एक धक्के बसले. ऋतुराज बाद झाल्यावर मोइन अली, सुरेश रैना आणि त्यानंतर फॅफ ड्यू प्लेसिस (४१) बाद झाले आणि चेन्नईचा संघ अडचणीत येईल, असे वाटत होते. पण यावेळी महेंद्रसिंग धोनी आणि अंबाती रायुडू यांनी दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनीने यावेळी पूर्वीसारखाच विजयी षटकार ठोकला आणि चेन्नईने विजयाचा पताका फडकवला. या विजयासह चेन्नई गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे, त्याचबरोबर त्यांनी प्ले-ऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. पण दुसरीकडे या पराभवानंतर सनराझर्स हैदराबाचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे. चेन्नईने यावेळी नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचा हा निर्णय योग्य असल्याचे त्यांच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. जोश हेझलवूड आणि ड्वेन ब्राव्हो यांनी हैदरााबदच्या संघाला एकामागून एक धक्के दिले. त्यामुळे हैदराबादला यावेळी मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. अखेरच्या षटकांमध्ये हैदराबादने धावांचा वेग थोडा वाढवला, त्यामुळेच त्यांना चेन्नईच्या संघापुढे १३५ धावांचे आव्हान ठेवता आले होते, पण अखेर त्यांना या सामन्यात पराभव पत्करावा लागला.