वर्सोवा-विरार सागरी मार्गासाठी पुढचे पाऊल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 25, 2021

वर्सोवा-विरार सागरी मार्गासाठी पुढचे पाऊल

https://ift.tt/2ZkFnXO
म. टा. प्रतिनिधी वर्सोवा ते विरार या प्रस्तावित सागरी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केली आहे. पेंटॅकल कंन्सल्टंट प्रा. लि. कंपनीला हे काम देण्यात आले आहे. दोन वर्षांच्या मुदतीत कंपनीला प्रकल्पाचा अहवाल एमएसआरडीसीला सादर करावा लागणार आहे. वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्गाचे काम एमएसआरडीसीमार्फत सध्या सुरू आहे. त्या प्रकल्पाच्या पुढील भाग म्हणून विरारपर्यंत सागरी मार्ग बांधण्याचे प्रस्तावित आहे. एमएसआरडीसीमार्फत वर्सोवा ते विरार दरम्यान हा ४२.७५ किलोमीटर अंतराचा सागरी मार्ग बांधला जाणार आहे. या मार्गासाठी सुमारे ३२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर चार-चार मार्गिकांच्या दोन लेन असतील. समुद्र किनाऱ्यापासून एक किलोमीटर आतमधून हा मार्ग बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी प्रकल्पाचा अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पेंटॅकल कंन्सल्टंट कंपनीला एमएसआरडीसीकडून स्वीकृती पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रकल्पाच्या अभ्यासाचे काम पुढील काही दिवसात सुरू होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या सल्लागार कंपनीकडून