
मुंबई- मराठीसह हिंदी प्रेक्षकांवरही गारुड घालणारा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम '' सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी ३' ने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. घरातील सदस्य या आठवड्यात घराबाहेर झाला आहे. आदीशच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. दोन आठवड्यापूर्वीच आदिशची बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली होती. आदिशच्या येण्याने घरातील समीकरणं बदलणार अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती. परंतु, या आठवड्यात आदिश एलिमिनेट झाल्याने प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला आहे. या आठवड्यात घरातील सदस्यांनी टास्क खेळताना सगळ्या सीमा पार केल्या होत्या. मारामारी, भांडणं, झटापटी यामुळे घरातील सदस्य बिग बॉसने दिलेला एकही टास्क व्यवस्थित पूर्ण करू शकले नाहीत. आठवड्याभरात घरातील सदस्य जे वागले त्याबद्दल महेश मांजरेकर यांनी सगळ्यांनाच खडे बोल सुनावले. एकेकाला धारेवर धरत मांजरेकर यांनी सदस्यांना घराची शिस्त पाळण्याचा आदेश दिला. या आठवड्यात घरात घडलेल्या गोष्टींवर मांजरेकर इतके भडकले की त्यांनी घरातील सदस्यांसोबत बोलायला देखील नकार दिला होता. या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये दादूस, मीनल, विकास आणि आदिश यांची नावं होती. मात्र बिग बॉसने जेल तोडल्याबद्दल विशाल निकम यालाही घराबाहेर होण्यासाठी पात्र ठरवलं होतं. मात्र विकास आणि मीनल सेफ झाले. तर दादूस आणि आदिश डेन्जर झोनमध्ये आले. त्यात आदिशने घराचा निरोप घेतला. आदिशचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. आदिशच्या जाण्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.