आज पंतप्रधान मोदींच्या संबोधनात काय? 'सोशल मीडिया'वर रंगली चर्चा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 22, 2021

आज पंतप्रधान मोदींच्या संबोधनात काय? 'सोशल मीडिया'वर रंगली चर्चा

https://ift.tt/2Zi8SK6
नवी दिल्ली : आज (शुक्रवारी) सकाळी १०.०० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅन्डलवरून यासंबंधी माहिती देण्यात आलीय. या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटिझन्स अधिक अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी पंतप्रधानांच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदी आता आपल्या भाषणातून देशाला काय सांगणार आहेत? याची उत्सुकता अनेकांना लागलीय. अनेकांच्या म्हणण्यानुसार, लसीकरणाच्या १०० कोटी मात्रांच्या भारताच्या यशाचा उल्लेख पंतप्रधान आपल्या भाषणात करू शकतात. तसंच आगामी दिवसांत येणाऱ्या सणासुदीच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा दिल्या जाऊ शकतात. तर काही जण काश्मीरच्या मुद्यावर पंतप्रधान काय बोलणार? याकडे लक्ष देऊन आहेत. अनेक जणांना पंतप्रधान मोदी पेट्रोल - डिझेलच्या मुद्यावर काय सांगणार? याची उत्सुकता आहे. काहींनी तर पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर निशाणा साधत, संबोधनाऐवजी एखादी पत्रकार परिषद घेतली असती तर चांगलं ठरलं असतं, असंही मोदींना उद्देशून म्हटलंय. काही यूझर्सनं पेट्रोल डिझेलच्या किंमती आता कमी होण्याची शक्यता व्यक्त केलीय. तर, काही नेटिझन्सनं पंतप्रधानांच्या संबोधनावर निशाणा साधताना देशातील बेरोजगारीचा मुद्यावर लक्ष वेधलंय. 'सर, काही नोकऱ्यांबद्दलही बोला', असंही काही नेटिझन्सनं म्हटलंय.