ST कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढ; दिवाळी भेट जाहीर, पगार 'या' तारखेला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 26, 2021

ST कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढ; दिवाळी भेट जाहीर, पगार 'या' तारखेला

https://ift.tt/3vKRqK3
मुंबई: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली असून म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये तर कर्मचाऱ्यांना २५०० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल परब यांनी केली. ( ) वाचा: परिवहन मंत्री म्हणाले, 'या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणारा पगार यंदा नोव्हेंबरच्या १ तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे.' एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे परब यांनी आभार मानले. वाचा: करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता १७ टक्के होणार असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले. एसटीची १७.१७ टक्के एकीकडे एसटी महामंडळाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही दिवाळी भेट मिळाली असताना दुसरीकडे प्रवाशांवर मात्र भाडेवाढीचा भार पडणार आहे. इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला ताण कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने भाडेवाढ लागू केली आहे. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. ही भाडेवाढ लगेचच लागू करण्यात आली असून भाडे किमान ५ रुपयांनी वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रुपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. वाचा: