T20 World Cup 2021: वर्ल्डकपसाठी तयारी झाली का? आज कळणार टीम इंडियाची ताकद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 18, 2021

T20 World Cup 2021: वर्ल्डकपसाठी तयारी झाली का? आज कळणार टीम इंडियाची ताकद

https://ift.tt/3prdxEn
दुबई: टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट मोहिमेला प्रारंभ करण्यापूर्वी भारतीय संघाचा आज सोमवारी इंग्लंडशी सराव सामना होईल. या सामन्यात दुसरा सलामीवीर म्हणून ईशान किशन आणि लोकेश राहुल यांच्यापैकी कोणाला पसंती मिळणार, याबाबत औत्सुक्य आहे. याशिवाय अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या फॉर्मचीही चिंता भारतीय संघाला आहे. यासोबतच फलंदाजीच्या योग्य क्रमाची घडी बसवण्यावर कर्णधार विराट कोहलीचे लक्ष असणार आहे. वाचा- भारतीय संघ रविवारी (२४ ऑक्टोबर) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने वर्ल्ड कप मोहिमेला प्रारंभ करणार आहे. त्याआधी, भारतीय संघाचे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामने आहेत. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध आज, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारी सराव सामना खेळणार आहे. वाचा- ... भारतीय संघातील सर्व खेळाडू आयपीएलमध्ये खेळले आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या सरावाची चिंता नाही. मात्र, पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी अचूक संयोजन बनवण्यासाठी कोहलीचा प्रयत्न असणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यांत भारतीय संघ व्यवस्थापन अंतिम संघात स्थान निश्चित नसलेल्या खेळाडूंची चाचणी घेईल. त्यांना फलंदाजी आणि गोलंदाजीत अधिक संधी देण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे त्यांच्या सध्याच्या फॉर्मबाबत अधिक कल्पना येईल. वाचा- उपकर्णधार रोहित शर्माचे सलामीवीर म्हणून स्थान निश्चित आहे. मात्र, रोहितसोबत सलामीला कोण, हे महत्त्वाचे आहे. यासाठी ईशान किशन आणि लोकेश राहुलपैकी एकाची निवड होईल. अर्थात, ही निवड कठीण असेल. सराव सामन्यांत कदाचित ईशान किशन आणि राहुल या दोघांनाही संधी अपेक्षित आहे. यातून कोण चांगल्या फॉर्ममध्ये आहे, हे अधिक कळू शकेल. ईशानपेक्षा राहुलचे पारडे जड आहे. कारण, त्याच्याकडे दडपणाखाली खेळण्याचा जास्त अनुभव आहे. आयपीएलमध्ये राहुलने १३८.८०च्या स्ट्राइक रेटने ६२६ धावा केल्या. मुंबईकडून खेळणाऱ्या ईशानने अखेरच्या दोन सामन्यांत तडाखेबंद अर्धशतके झळकावली. दोन्ही सामन्यांत तो रोहितसह सलामीला आला होता. रोहितसोबत सलामीसाठी राहुलला पसंती मिळाली तर किशन आणि हार्दिक यांच्यात सहाव्या क्रमांकासाठी चुरस असेल. हार्दिक आणि किशन अमीरातीमधील आयपीएलचा टप्पा अपयशी ठरले आहेत. हार्दिकचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. तो गोलंदाजी करण्याची शक्यता कमी आहे. संधी मिळाल्या तो यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या आधी फलंदाजीस येणार की नंतर, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. फिरकीत रवींद्र जडेजाचे स्थान जवळपास निश्चित आहे. वरुण चक्रवर्ती तंदुरूस्त असेल, तर त्यालाही पसंती मिळेल. तिसरा फिरकीपटू म्हणून राहुल चहर आणि रविचंद्रन अश्विन यांच्यात चुरस असेल. वेगवान गोलंदाजीची भिस्त जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर यांच्यावर असेल. मात्र, दोनच फिरकीपटूंना खेळवल्यास शार्दूल ठाकूरला संधी मिळू शकते. वाचा- इंग्लंडची भिस्त जोस बटलर, जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो या फलंदाजांवर आहे. कर्णधार इऑन मॉर्गनला आयपीएलमध्ये फलंदाजीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. साहजिकच सराव सामन्याद्वारे फॉर्ममध्ये परतण्यासाठी मॉर्गन प्रयत्नशील असेल. इंग्लंडविरुद्ध भारताचे दमदार रेकॉर्ड आहे. आतापर्यंत दोन्ही संघात १९ लढती झाल्याअसून त्यापैकी १० लढती भारताने तर ९ लढती इंग्लंडने जिंकल्या आहेत. फेब्रुवारी मार्चमध्ये भारताने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ३-२ने जिंकली होती. तर २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या पहिल्या लढतीत भारताने इंग्लंडचा १८ धावांनी पराभव केला होता. तेव्हा इंग्लंडने एका षटकात ६ सिक्स मारले होते. सराव सामना: भारत-इंग्लंड, वेळ : सायं. ७.३० पासून