इंधन दर ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 12, 2021

इंधन दर ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव

https://ift.tt/3kwtwgP
मुंबई : आज शुक्रवारी चार प्रमुख महानगरातील पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. सलग आठव्या दिवशी स्थिर आहेत. मुंबईत एक लीटर ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये आहे. केंद्र सरकारने दिवाळीत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपयांची कपात केली होती. त्यांनतर जवळपास २३ राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. त्यामुळे तेथे पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त झाले आहे. केंद्राची शुल्क कपात आणि राज्यांची व्हॅटमध्ये कपात झाल्यामुळे पेट्रोलवरील कर ५० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर डिझेलवरील कराचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचा भाव वाढला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव शुक्रवारी ०.७५ टक्क्यांनी कमी झाला आणि प्रती बॅरल ८२.२५ डॉलर इतका झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.७१ टक्क्यांनी कमी झाला आणि तो ८१.०१ डॉलर प्रती बॅरल झाला.