न्यूझीलंडच्या खेळाडूने हे काय केले; रागाच्या भरात हात मोडून घेतला, फायनलच्या आधी मोठा धक्का - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 12, 2021

न्यूझीलंडच्या खेळाडूने हे काय केले; रागाच्या भरात हात मोडून घेतला, फायनलच्या आधी मोठा धक्का

https://ift.tt/3C3wUpD
अबुधाबी: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता १४ नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या दोन्ही संघात जेतेपदासाठी लढत होणार आहे. दोन्ही संघांनी अद्याप टी-२०चे एकही विजेतेपद मिळवले नसल्याने यावेळी नवा विजेता मिळणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे अंतिम सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. वाचा- सेमीफायनल लढती न्यूझीलंडने इंग्लंडवर जबरदस्त असा विजय साकारला. पण या सामन्यात न्यूझीलंडला एक मोठा धक्का देखील बसलाय. संघातील विकेटकीपर आणि फलंदाज हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे. इतक नव्हे तर १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत दौऱ्यात तो खेळू शकणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायलनमध्ये रागाच्या भरात एक असे कृत्य केले ज्यामुळे त्याचा हात मोडला. इंग्लंडविरुद्ध विकेट गमावल्यानंतर कॉन्वेने रागात बॅटवर हात मारला. यामुळे त्याच्या हाताला फॅक्चर झाले आहे. वाचा- न्यूझीलंड क्रिकेट संघाने दिलेल्या माहितीनुसार डेवन कॉन्वे हा टी-२० वर्ल्डकप आणि भारत दौऱ्यातून बाहेर झाला आहे. त्याचा डावा हात मोडला आहे. कॉन्वेला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हातावर दुखापत झाली होती. न्यूझीलंड क्रिकेटने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी म्हटले आहे की, कॉन्वे फार दुखी आहे. आपण संघाची आशा तोडली अशी त्याची भावना आहे. आम्ही देखील त्याला मिस करू. वाचा- ... सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंड इंग्लंडने दिलेल्या १६७ धावांचा पाठलाग करत होता. १४व्या षटकात कॉन्वे बाद झाला. तेव्हा न्यूझीलंडला ३८ चेंडूत ७२ धावांची गरज होती. लियाम लिव्हिंगस्टेनचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करताना तो स्टंप आउट झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने हात बॅटवर मारला. वाचा-