ज्ञानदेव वानखेडे यांची आता हायकोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे धाव, अर्जात म्हणतात... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 25, 2021

ज्ञानदेव वानखेडे यांची आता हायकोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे धाव, अर्जात म्हणतात...

https://ift.tt/3oXZaWb
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अल्पसंख्याकमंत्री यांना आपल्या कुटुंबाविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करणारा आदेश देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्ती पीठाने फेटाळल्याने त्याला यांचे वडिल यांनी बुधवारी दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर अपिलाद्वारे आव्हान दिले. या अपिलावर आज, गुरुवारी न्या. शाहरुख काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी होणार आहे. 'मलिक हे माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी करणारे ट्विट करत आहेत आणि विधाने करत आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई देण्याचा आदेश देण्याबरोबरच त्यांना आणखी बदनामीकारक विधाने करण्यास मनाई करावी', अशी विनंती ज्ञानदेव यांनी मानहानीच्या दाव्यातील तातडीच्या अर्जाद्वारे केली होती. त्याविषयीच्या सुनावणीअंती न्यायमूर्ती माधव जामदार यांनी २२ नोव्हेंबरला आपला अंतरिम निर्णय देताना मलिक यांना विधाने करण्यास मनाई करण्याची विनंती फेटाळली. मात्र, त्याचवेळी यापुढे काहीही बोलायचे असल्यास किंवा ट्विट करायचे असल्यास आधी खातरजमा करावी, असे निर्देशही न्यायमूर्तींनी मलिक यांना दिले होते. 'मलिक यांचे वानखेडे यांच्याविरोधातील ट्विट्स हे वैयक्तिक आकसापोटी असल्याचे स्पष्ट होते', असे निरीक्षणही न्यायमूर्तींनी नोंदवले. या पार्श्वभूमीवर, वानखेडे यांनी अॅड. दिवाकर राय यांच्यामार्फत तातडीने अपिल दाखल केले. 'मलिक यांचे ट्विट्स हे वैयक्तिक आकसापोटी असल्याचे स्पष्ट होते आणि त्यातून वानखेडे यांची बदनामी झाली, असे निरीक्षण न्या. जामदार यांनी अंतरिम आदेशात नोंदवले. त्यामुळे ते पाहता मलिक यांना आणखी काही बोलण्यास मनाई करणारा आदेशही देणे आवश्यक होते', असे म्हणणे वानखेडे यांनी अपिलात मांडले आहे.