ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप; अनिल परब म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 2, 2021

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप; अनिल परब म्हणाले...

https://ift.tt/3w81E7f
मुंबई: ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहिनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासार्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. यांनी केले. दिवाळीनंतर सकारात्मक चर्चेचे आश्वासनही परब यांनी दिले आहे. ( ) वाचा: ' सणाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेला म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याची जाहीर केले होते. त्यानुसार सुधारित महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर २०२१ चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. राहिलेल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आहे. यावर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येणार आहे', असे अनिल परब यांनी नमूद केले. वाचा: गेली दोन वर्षे महामारीमुळे एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक अडचणीत असतानादेखील आतापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे. सध्या ८५ टक्के आगारातील वाहतूक सुरुळीत सुरु असून उर्वरित १५ टक्के आगारातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही विस्कळीत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. तेव्हा संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कामावर रूजू व्हावे व दिवाळी सणादरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असेही परिवहनमंत्री परब यांनी सांगितले. वाचा: