कुशल मनुष्यबळाची वानवा;नोकरी सोडणाऱ्यांची संख्या वाढली,'ही'आहेत त्यामागील कारणे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 23, 2021

कुशल मनुष्यबळाची वानवा;नोकरी सोडणाऱ्यांची संख्या वाढली,'ही'आहेत त्यामागील कारणे

https://ift.tt/3cEassH
नवी दिल्ली : करोना महामारीमुळे जगभरात सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. भारतातही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. देशात झपाट्याने वाढत चालल्याची सद्यस्थिती आहे. ही स्थिती केवळ भारतातच नाही, तर जगभरात तिचा प्रभाव वाढत आहे. एका अहवालानुसार, जगभरात नोकरी सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी, अनेक देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे. विश्लेषक फर्म व्हिजियरच्या आकडेवारीनुसार, यूएसमधील चारपैकी किमान एका व्यक्तीने या वर्षी आपली नोकरी सोडली आहे. तसेच २०२१ वर्षाअखेरपर्यंत यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. अमेरिकेतील एका अहवालात असे म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये ४.४ दशलक्ष लोकांनी म्हणजेच जवळजवळ तीन टक्के कामगारांनी नोकऱ्या सोडल्या आहेत. करोनाच्या महामारीनंतर भारतासह अनेक देशांची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी धडपडत असताना, लोकांनी अचानक नोकरी सोडणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. हातात नोकरी असताना लोक नोकरी सोडत आहेत, असे नाही. तर अनेक लोक थकवा, कामाचा कंटाळा या कारणांमुळे नोकरी सोडत असल्याचे अहवालात म्हटले आहे. कॅनडा आणि यूके सारख्या इतर देशांमध्येही अशाच समस्या उद्भवत आहेत. जर्मनीमध्ये, एक तृतीयांशपेक्षा जास्त कंपन्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे जुलैपासून कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. हा आकडा गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी आकडा आहे. सॉफ्टवेअर प्रमुख मायक्रोसॉफ्टने या वर्षी मार्चमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, जागतिक कर्मचार्‍यांपैकी ४१ टक्के लोक त्यांच्या सध्याच्या नोकर्‍या सोडण्याचा विचार करत आहेत, तर ४६ टक्के करियर बदलण्याचा विचार करत आहेत. ४० टक्के लोक काम बदलण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. नोकरी सोडणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. भारताबद्दल बोलायचे झाले, तर इथेही जवळपास तशीच परिस्थिती आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात अ‍ॅट्रिएशनचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. आयटी क्षेत्रात २३ टक्के लोकांनी नोकऱ्या बदलल्या आहेत.