केंद्रीय मंत्री गडकरींविरुद्धच्या याचिकेवरील निकाल राखीव; युक्तिवाद संपला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 27, 2021

केंद्रीय मंत्री गडकरींविरुद्धच्या याचिकेवरील निकाल राखीव; युक्तिवाद संपला

https://ift.tt/3E1yTwj
म.टा. प्रतिनिधी, नागपूर (Nitin Gadkari) यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत खोटे दाखल करून यश मिळविल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवरील युक्तिवाद संपुष्टात आला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. ए. एस. चांदूरकर यांनी यावरील निकाल राखून ठेवला आहे. (The decision on the petition against Union Minister has been reserved by the court) क्लिक करा आणि वाचा- गडकरी यांनी निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप () यांनी केला आहे. या शपथपत्रात गडकरी यांनी आपली संपत्ती, उत्पन्न तसेच वैयक्तिक माहिती चुकीची दिल्याचा दावा केला आहे. यामुळे मतदारांची दिशाभूल झाली असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. मात्र, गेल्या सुनावणीत गडकरी यांनी पलटवार केला होता. पटोले यांनी या याचिकेसाठी दाखल केलेले शपथपत्र बेकायदेशीर असल्याचा प्रतिदावा केला होता. क्लिक करा आणि वाचा- पटोलेंचे वकील सतीश उके यांनी याला विरोध केला असून पटोलेंचे शपथपत्र नियमांनुसारच असल्याचा दावा केला आहे. पटोलेंनी केलेले आरोप हे केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर करण्यात आलेत. आरोपांबाबत त्यांच्याकडे ज्ञान किंवा सबळ पुरावेही नाहीत, असा युक्तिवाद गडकरींतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर आणि अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी केला. क्लिक करा आणि वाचा- याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. सतीष उकेंनी बाजू मांडली आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला आहे. पुढील सुनावणीदरम्यान यावर निकाल अपेक्षित आहे.