संपकऱ्यांना पगार नाही; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 26, 2021

संपकऱ्यांना पगार नाही; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

https://ift.tt/3p4Si9t
म. टा. प्रतिनिधी, राज्यातील सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला लवकरच महिना होईल. अशातच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळणार नसल्याचा मोठा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार अत्यंत तुटपुंजे आहेत. यामुळे जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांवर एसटी बँक, खासगी व सरकारी बँका, पतपेढ्या यांचे कर्ज आहे. आधीच कमी पगार त्यात थकणारे हप्ते, त्यांचे व्याज अधिक दंड यांमुळे कर्मचारी चिंतेत आहेत. नोव्हेंबर महिन्याचा पगार झाला नाही तर कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. संपकाळात जे कर्मचारी कामावर हजर होते, त्या दिवसांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळेल. मात्र जे कर्मचारी संपावर असल्याने गैरहजर होते किंवा आहेत त्यांना पगार मिळणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी कामच केले नाही तर त्यांना पगार देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. संपात ८२ हजारावर कर्मचारी एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ९२ हजार २६६ कर्मचारी आहेत. संपात ८२,५६१ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला असून यात चालक-वाहक तसेच कार्यशाळेतील एकूण ७९,६१७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत ९,७०५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.