१५ लाखांची रोकड घेऊन व्यापारी घरी निघाला पण वाटेत ५ तरुणांनी अडकले; अन् - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 27, 2021

१५ लाखांची रोकड घेऊन व्यापारी घरी निघाला पण वाटेत ५ तरुणांनी अडकले; अन्

https://ift.tt/3p83NwT
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव ते पाळधी दरम्यान महामार्गावरुन फरकांडे येथे घरी जाणाऱ्या कापूस व्यापऱ्याकडील रोकड लुटण्यासाठी आलेल्या पाच जणांनी तरुण कापूस व्यापाऱ्याचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता तिरुपती कंपनीसमोर घडली. या व्यापाऱ्याकडील बॅगेत असलेली १५ लाखांची रक्कम सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. स्वप्नील रत्नाकर शिंपी (२७, रा. फरकांडे ता. एरंडोल) असे मृत तरुण व्यापाऱ्याचे नाव आहे. काल शुक्रवारी दुपारी स्वप्नील रत्नाकर शिंपी व त्याच्याकडे काम करणारा दिलीप राजेंद्र चौधरी असे दोघे जण चारचाकीने (क्र. एम.एच.०१ एएल ७१२७) जळगावात आले होते. जळगावातील काम आटोपल्यावर रात्री ते फरकांड्याकडे निघाले होते. सोबत असलेल्या बॅगमध्ये सुमारे १५ लाखांची रक्कम होती. वाटेत पाळधीनजीक दोन दुचाकीवर आलेल्या चार जणांनी त्यांच्या कारला मोटारसायकल आडवी लावली. कट मारल्याचा बहाणा करीत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एकाने कारचा दरवाजा उघडून पैशांची बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला. स्वप्नील याने विरोध केला. त्याचवेळी एकाने स्वप्नील याच्या मांडीवर व पाठीवर चाकूने वार केला. वाचाः या झटापटीत किरकोळ मार लागल्याने राजेंद्र हा तिथून पळाला, जखमी अवस्थेत पैशाची बॅग घेऊन स्वप्नील हा खाली उतरला. गर्दी होत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. जखमी स्वप्नील यास रुग्णवाहिकेतून खाजगी व तिथून जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट दिली. स्वप्नील याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली आहेत. पत्नी गरोदर आहे. वडीलही कापसाचे व्यापारी आहेत. कासोदा येथेत्याचे धनदाई ट्रेडर्स हे दुकान आहे. वाचाः