म. टा. प्रतिनिधी । स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला एकरकमी एफ.आर.पी. मिळावी (Sugarcane Rate Issue) अशी मागणी केली आहे. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एकरकमी रक्कम जाहीर केली. सांगली () जिल्ह्यात मात्र दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी एकरकमी एफ आर पी जाहीर केली आहे. तर पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांच्या साखर कारखान्याची एफ आर पी जाहीर केलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा वाळवा आणि कडेगाव तालुक्यात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पेटवले. एकरकमी एफ आर पी साठी आक्रमक बनल्याने ऊस दराचे आंदोलन आता हिंसक वळणावर पोहोचले आहे. वाचा: सांगली जिल्ह्यातील दोन साखर कारखाने वगळता इतर साखर कारखान्यांनी अद्यापही उसाची एकरकमी एफ आर पी जाहीर केलेली नाही. एकरकमी एफ आर पी जाहीर करो कारखान्यांनी ऊस तोडी सुरू कराव्यात असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले होते. मात्र राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा पालकमंत्री जयंत पाटील, क्रांती साखर कारखान्याचे प्रमुख आमदार अरुण लाड, विश्वास साखर कारखान्याचे प्रमुख आमदार मानसिंगराव नाईक या नेत्यांनी आपल्या कारखान्यांची एकरकमी एफ आर पी जाहीर केलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पेटवले. जिल्ह्यात एक रकमी एफ आर पी चे आंदोलन हिसक वळणावर पोहचले आहे आहे. वाचा: राजारामबापू साखर कारखान्याचा ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे पेटवण्यात आला. तर क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यात बलवडी फाटा येथे रात्री उशिरा पेटविण्यात आला. विश्वास साखर कारखान्याचा ट्रॅक्टर तांदुळवाडी येथे पेटविण्याचा प्रयत्न झाला. या घटनांमुळे ट्रॅक्टर मालकांचे नुकसान झाले. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तातडीने एकरकमी एफआरपी जाहीर करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल ट, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.