मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; लोकल पास व तिकिटाबाबत मोठा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 24, 2021

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; लोकल पास व तिकिटाबाबत मोठा निर्णय

https://ift.tt/30PSMIy
मुंबई: कोविडवरील लसचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या सर्व प्रवाशांसाठी मुंबई उपनगरीय लोकलचे दरवाजे उघडण्यात आल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकलचं तिकीट तसेच पास मिळवण्यात प्रवाशांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन तसेच तिकीट खिडकीवरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने पुन्हा एकदा अ‍ॅपच्या माध्यमातून ही सुविधा देण्याबाबत पावले टाकण्यात आली आहेत. ( ) वाचा: पूर्ण झालेल्या प्रवाशांना प्रवासासाठी राज्य सरकारकडून युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा पास असेल तरच सध्या लोकलचं तिकीट वा पास दिला जात आहे. राज्य सरकारचं संबंधित अ‍ॅप आणि रेल्वेची अर्थात यूटीएस मोबाइल अ‍ॅप आता लिंक करण्यात आले असून आज मध्यरात्रीपासून लसीकरण झालेले प्रवासी यूटीएस अ‍ॅपच्या माध्यमातून लोकलचं तिकीट वा पास मिळवू शकणार आहेत. वाचा: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र सरकारच्या युनिव्हर्सल पासशी रेल्वेने आपलं यूटीएस मोबाइल अ‍ॅप लिंक केलं असून आता या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट तसेच पास उपलब्ध होईल. आज रात्रीच ही सुविधा आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे अगदी उद्यापासूनच या सेवेचा प्रवाशांना लाभ मिळेल. उद्याच्या प्रवासासाठीचे तिकीट प्रवासी आज रात्री काढू शकणार आहेत, असे लाहोटी यांनी नमूद केले. अँड्रॉइड फोनवर यूटीएस अ‍ॅप आधीच उपलब्ध आहे तर आयओएस अ‍ॅप आज रात्रीपासून सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले. वाचा: