'या' मद्यप्रेमींचे होणार वांधे, कारण आता 'नो वॅक्सीन, नो दारू' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 24, 2021

'या' मद्यप्रेमींचे होणार वांधे, कारण आता 'नो वॅक्सीन, नो दारू'

https://ift.tt/3nL3QiM
औरंगाबाद: करोना लसीकरणाची टक्केवारी ( Corona vaccination percentage ) वाढवण्यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जात आहेत. तर, काही ठिकाणी कठोर नियमांची अंमलबजावणी सुध्दा केली जात आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सुद्धा कोरोनाच्या लसीकरणाला वेग यावा म्हणून काही आदेश काढले आहेत. यांमध्ये 'नो वॅक्सीन नो दारू' (No vaccine, no alcohol) या नियमाचा समावेश आहे. त्यामुळे आता ज्यांनी करोना प्रतिबंधन लशीचे डोस घेतले नाहीत अशा मद्यप्रेमींचे वांदे होणार आहेत. ( campaign now in district) क्लिक करा आणि वाचा- जिल्हाधिकारी चव्हाण यांनी काढलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने, वाईन/बिअर शॉप, देशी दारू दुकाने, FL3 अनुज्ञप्ती धारक मद्य व मार्क विक्रीच्या ठिकाणी असलेल्या दुकानात कार्यरत सर्वांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत. तसेच दारू विकत घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना किमान एक डोस घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे यापुढे अशाच ग्राहकांना दारू विक्री करावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. क्लिक करा आणि वाचा- तसेच यापुढे हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय, धाबा, खानावळ आणि इत्यादी खाद्य सेवा देणाऱ्या ठिकाणी असलेल्या कामगारांना सुद्धा करणे बंधनकारक असणार आहे. तसेच यापुढे लसीकरण नसलेल्या व्यक्तींना पेट्रोल-डिझेल सुद्धा मिळणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाच्या मोहिमेला वेग येत असल्याचा दावा सुद्धा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे. क्लिक करा आणि वाचा-