मुंबईतील ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे कोल्हापुरात!; 'त्या' महिलेचं बिंग फुटलं? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 17, 2021

मुंबईतील ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे कोल्हापुरात!; 'त्या' महिलेचं बिंग फुटलं?

https://ift.tt/3FnvyrH
कोल्हापूर: टीमने जिल्ह्यात तालुक्यातील येथे एका फार्महाऊसवर छापा टाकून परिसराची झाडाझडती घेतली. त्या ठिकाणी ड्रग पकडल्याची चर्चा आहे. ढोलगरवाडी हे सापांसाठी प्रसिद्ध असल्याने सापाच्या विषाचा उपयोग ड्रगसाठी होत आहे का, याची पडताळणी पोलीस करत असल्याचे सांगण्यात आले. ( ) वाचा: पोलिसांनी मुंबईतील एका महिला ड्रग पेडलरला अटक केली आहे. अटक केलेल्या महिलेकडे चौकशी केली असता त्याचे धागेदोरे ढोलगरवाडी येथे पोहचले. ही महिला ढोलगरवाडी येथे अधूनमधून येत जात होती. पोलिसांचे पथक ड्रग पेडलर महिलेला ढोलगरवाडी येथे घेऊन आले. तिथे एका फार्महाऊसवर छापा टाकून तिथे तपासणी केली. हा फार्महाऊस एका वकिलाचा असून तो शिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. या पथकाने या वकिलालाही ताब्यात घेतले आहे. या पथकाने फार्महाऊसवरून अमली पदार्थ जप्त केले असल्याची माहिती कळाली आहे. वाचा: पोलिसांच्या पथकाने फार्महाऊसवरील कर्मचाऱ्यांकडेही चौकशी केली आहे. तसेच फार्महाऊसच्या परिसराची कसून तपासणी केली जात आहे. तपासणीच्यावेळी स्थानिक नागरिकांना पोलिसांनी प्रवेश नाकारला होता. अतिशय गुप्त पद्धतीने ही चौकशी केली जात आहे. स्थानिक गडहिंग्लज आणि चंदगड पोलिसांनाही चौकशी आणि तपासात सहभागी करून घेतलेले नाही. ढोलगरवाडी हा भाग सापांसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी नागपंचमी दिवशी येथे यात्रा भरते. या ठिकाणी सर्पोद्यान असून परिसरात विषारी साप आणि नाग मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सापांच्या विषाचा वापर करून काही अमली पदार्थ तयार केले जातात. त्यामुळेच त्या अंगाने तपास पोलीस करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. वाचा: