नवी दिल्लीः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. यांनी इंडिगो विमानात ( ) एका व्यक्तीला प्रथमोपचार देऊन त्याचे प्राण वाचवले. यानंतर डॉ. भागवत कराड यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून कराड यांचं कौतुक केलं आहे. तर डॉ. कराड यांनीही ट्विट करून आभार मानले आहेत. भागवत कराड हे हृदयापासून डॉक्टर आहेत. आपले सहकारी भागवत कराड यांनी शानदार काम केले आहे, असं ट्विट करत पंतप्रधान मोदींनी कराड यांचं तोंड भरून कौतुक केलं. डॉ. कराड यांनीही ट्विट करून विनम्रपणे रिप्लाय दिला. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. कौतुक केल्याबद्दल खूप आभार. मी फक्त पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि त्यांच्या दृष्टीकोनातून काम करण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदींनी कायम देश आणि जनतेची सेवा आणि समर्पणातून काम करण्यास सांगितलं आहे, असं डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या ट्विटला रिप्लाय देताना म्हटलंय. धर्मेंद्र प्रधान यांनीही ट्विट करून कराड यांचं कौतुक केलं आहे. इंडिगोच्या विमानाने दिल्लीहून उड्डाण केले. हे विमान मुंबईला निघाले होते. विमानाच्या उड्डाणानंतर एका तासाने एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडली. त्याला प्रचंड अस्वस्थ वाटत होतं. यानंतर विमानाच्या केबिन क्रूने फ्लाइटमध्ये कुणी डॉक्टर आहे का? अशी विचारणा केली. यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड जे स्वतः व्यवसायाने डॉक्टर आणि सर्जन आहेत, ते मदतीसाठी धावून आले. डॉक्टर कराड यांनी प्रवाशाला प्रथमोपचार दिले आणि फ्लाइटमध्ये उपलब्ध असलेल्या इमर्जन्सी किटमधून प्रवाशाला इंजेक्शनही दिले. इंडिगोने ट्विट करून केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे आभार मानले. केंद्री अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे खूप आभार. ते नॉन स्टॉप आपले कर्तव्य करत राहिले. डॉ कराड यांनी एका प्रवाशाला केलेली मदत प्रेरणादायी होती, असं इंडियोने ट्विटमध्ये म्हटलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा जुलैमध्ये विस्तार झाला. त्यावेळी डॉ. भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. औरंगाबादचे असलेले डॉ. कराड हे महाराष्ट्रातून राज्यसभेचे भाजपचे खासदार आहेत.