नवी दिल्ली : आज ... दिवाळीचा पहिला दिवस... परंतु, दिवाळीच्या काही आठवड्या अगोदरपासूनच देशातील बाजारपेठा प्रचंड मोठ्या प्रमाणात गजबजू लागलेल्या दिसल्या. दिल्लीत सदर बाजर, लाजपत नगर आणि सरोजिनी बाजारात पाय ठेवायलाही जागा उरलेली नाहीत. मुंबईतही दक्षिण मुंबई, दादर, गांधी मार्केट या भागांत गर्दीतून वाट काढत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसतेय. कोलकाता, चेन्नई, सूरत, इंदौर या देशातील इतर महत्त्वाच्या शहरांतील परिस्थितीही काही वेगळी नाही. खरेदीसाठी बाजारात पोहचलेले अनेक ग्राहक मास्क वापरण्याचीही तसदी घेताना दिसत नाहीत. , सॅनिटायझरचा वापर अशा अनेक करोना नियमांना पायदळी तुडवण्यात येतंय. अनेक ठिकाणी गर्दीवर कुणाचही नियंत्रण नाही. बाजारात ग्राहकांनी प्रचंड गर्दी केल्यानं सोशल डिस्टन्सिंगला वावही उरत नसल्याचं दिसून येतं. गेल्या काही महिन्यांत करोनाचे आकडे खाली घसरलेले दिसून आलेत. त्यामुळे नागरिकांच्या मनातील करोनाची भीतीही नाहिशी झालीय. मात्र, करोना संक्रमण अद्याप मुळातून नष्ट झालेलं नाही. निमित्तानं बाजारपेठा गजबजू लागल्याचा आनंद निश्चितच दुकानदारांच्या आणि ग्राहकांच्या चेहऱ्यांवर दिसून येतंय. मात्र, हा सण आरोग्यदायी पद्धतीनं साजरा करण्यासाठी स्वस्थ राहणंही तितकंच गरजेचं आहे.
https://ift.tt/3myUMwU