केंद्र सरकारची इंधनातून बक्कळ कमाई; ५ वर्षात उत्पादन शुल्कापोटी ११ लाख कोटी कमावले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 30, 2021

केंद्र सरकारची इंधनातून बक्कळ कमाई; ५ वर्षात उत्पादन शुल्कापोटी ११ लाख कोटी कमावले

https://ift.tt/3I2GRHX
नवी दिल्ली : २०१६ ते २०२१ च्या पाच वर्षांच्या कालावधीत इंधनावर ११.७४ लाख कोटी रुपयांचे केंद्रीय उत्पादन शुल्क जमा केले गेले. यात सेसचाही समावेश आहे, अशी माहिती केंद्र सरकारने सोमवारी (२९ नोव्हेंबर) दिली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती लोकसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नावर लेखी उत्तरात दिली. चौधरी म्हणाले की, "एप्रिल २०१६ आणि मार्च २०२१ दरम्यान इंधनावरील सेससह ११.७४ लाख कोटींचा केंद्रीय उत्पादन शुल्क वसूल करण्यात आले. राज्य सरकारांना केंद्रीय कर आणि शुल्कातील हिस्सा महिन्याला वितरित केला जातो. हे वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारावर केले जाते. सरकारने उत्पादन शुल्कात केली कपातया महिन्यात दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कामध्ये ५ रुपये, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक राज्यांनी व्हॅटमध्येही कपात केली आहे, ज्यामुळे इंधन दरवाढीमुळे पोळून निघालेल्या सामान्य नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमतींनी १०० रुपयांचा आकडा केव्हाच पार केला आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या २७ दिवसांपासून स्थिर आहेत. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली आहे. आजही देशातील प्रमुख महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोल १०९.४५ रुपये तर डिझेल ९२.२५ रुपये प्रति लिटरवर आहे.