शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना 'सेक्सटॉर्शन कॉल' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 24, 2021

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना 'सेक्सटॉर्शन कॉल'

https://ift.tt/3nTLTPb
म. टा. खास प्रतिनिधी, महिला बोलत असल्याचे भासवत अश्लील व्हिडिओ कॉल करून शिवसेना यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मुंबई सायबर पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली. असे त्याचे नाव असून आमदारांना केलेला कॉल रेकॉर्डिंग करून मॉर्फिंगद्वारे त्याला अश्लील स्वरूप देण्यात आले होते. या गुन्ह्यात मौसममुद्दीन याचे अन्य काही साथीदार असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे. आपण अडचणीत असून मदतीची गरज असल्याचे संदेश मंगेश कुडाळकर यांच्या मोबाइलवर आला. कुणी अडचणीत असेल त्याला मदत मिळायला हवी, या भावनेने कुडाळकर यांनी संदेश आलेल्या क्रमांकांवर संपर्क केला. फोनवर बोलणारी एक महिला होती. ती व्हॉट्सअॅपवर वारंवार संदेश धाडत व्हिडीओ कॉल करीत होती. वारंवार कॉल येत असल्याने कुडाळकर यांनी तिचा व्हिडिओ कॉल स्वीकारला. मात्र बोलताना काही आक्षेपार्ह आढळल्याने त्यांनी कॉल कट केला. या कॉलनंतर कुडाळकर यांना पैशासाठी धमकावले जाऊ लागले. आपण केलेल्या अश्लील व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग केली असून ते नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये व्हायरल करण्याची धमकी देणारे संदेश त्यांना येऊ लागले. वाचा: प्रकरण फसवणुकीचे आहे, हे लक्षात आल्यावर कुडाळकर यांनी सायबर पोलिसांत तक्रार केली. लोकप्रतिनिधींना अशाप्रकारे धमकाविले जात असल्याचे याची गंभीर दखल घेत पश्चिम विभाग सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शर्मिला सहस्त्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सविता शिंदे यांच्यासह मंगेश मजगर, राहुल खेत्रे, गणेश शिर्के, दीपक पडळकर, अनिल वारे यांच्या पथकाने हा कॉल करणाऱ्या मौसममुद्दीन याला राजस्थानमधून शोधून काढले. आधुनिक तंत्रज्ञान आणि मॉर्फिग प्रणालीचा वापर करून मौसममुद्दीन आणि त्याच्या टोळीने अनेकांना ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. वाचा: