
विदिशा: मध्य प्रदेशातील जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सासऱ्याने आपल्या केला. या जीवघेण्या हल्ल्यात सूनेचे दोन्ही हात कापले. हल्ल्यानंतर सासरा घटनास्थळीच थांबून 'मी पोलिसांना घाबरत नाही' असं म्हणत होता. दुसरीकडे पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हल्लेखोर सासऱ्याला अटक केली. तर जखमी महिलेला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर तेथून भोपाळमधील रुग्णालयात पाठवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी घडली. आरोपी सासरा कैलाश चतुर्वेदी (वय ८०) विदिशात एका मंदिरात पुजारी आहे. काही दिवसांपूर्वी सून सीमा हिच्यासोबत त्याचे वाद झाला होता, असे सांगितले जाते. लग्नानंतरही तिनं शिक्षण आणि नोकरी करणे सुरूच ठेवले होते, यावरून सासऱ्याचा तिच्यावर राग होता. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे, असे सांगितले जात आहे. सून घरात पूजा करत होती. त्यावेळी आरोपी सासरा पाठिमागून आला आणि त्याने तिच्या डोक्यावर हल्ला केला. सूनेने स्वतःचा बचाव केला. तिने तलवार पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिचे दोन्ही हात तलवारीच्या हल्ल्याने तुटले. ती मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक धावून आले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला भोपाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी कैलाश चतुर्वेदीला अटक केली आहे. ९ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर हात जोडले भोपाळच्या खासगी रुग्णालयात पाच डॉक्टरांच्या पथकाने तब्बल ९ तास शस्त्रक्रिया करून महिलेचे दोन्ही हात पुन्हा जोडले. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.