सरकारची पुन्हा डोकेदुखी वाढली; 'या' कारणामुळे उद्या निवासी डॉक्टर संपावर! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 13, 2021

सरकारची पुन्हा डोकेदुखी वाढली; 'या' कारणामुळे उद्या निवासी डॉक्टर संपावर!

https://ift.tt/3wF0fFN
: यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या डॉ. अशोक पाल याच्या हत्येमुळे निवासी डॉक्टर संतापले असून उद्या शनिवारपासून नागपुरात मेडिकल व मेयो येथील निवासी डॉक्टरांनी संपावर () जाण्याचा निर्णय घेतला आहे. मृत अशोक पाल याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत देण्याची मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली आहे. मेडिकल परिसरात मार्डतर्फे आज निदर्शनेही करण्यात आली. यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात असलेल्या वसतिगृहाच्या मागील परिसरात डॉ. अशोक पाल हा एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी फिरत असताना काही अज्ञात इसमांनी त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेनं वसतिगृहात राहणाऱ्या राज्यातील डॉक्टर विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. डॉ. अशोक हा हुशार, मनमिळावू स्वभावाचा विद्यार्थी होता. तो रात्री आठच्या सुमारास परिसरात असलेल्या वाचनालयाजवळ असताना त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधात मार्डने आंदोलन पुकारलं असून शनिवारी सकाळी ८ पासून मेडिकल, मेयो तसंच अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा निवासी डॉक्टर बंद पुकारणार आहेत. निवासी डॉक्टरांसह इंटर्नस, एमबीबीएसचे विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. नागपुरात मेयो व मेडिकल मिळून जवळपास ९०० डॉक्टरांचा सहभाग या संपात राहणार असल्याची माहिती मेडिकलमधील मार्डचे अध्यक्ष डॉ. सजल बंसल यांनी मटाला दिली. संप पुकारण्यात आला असला तरी कोव्हिड वॉर्ड, अतिदक्षता विभाग, आकस्मिक सेवा येथे काम सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या घटनेतील आरोपींना १२ तासात अटक करावी, मृताच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी, वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येक वॉर्डात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी, दाखल रुग्णासोबत एकावेळी फक्त एकाच नातेवाईकाला आत येण्याची परवानगी द्यावी, रुग्णालयात येणाऱ्यांना प्रवेश पास अनिवार्य करावा, मेडिकलच्या प्रवेशद्वारावर आत येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जावी, संपूर्ण परिसरात पथदिवे तसंच २४ तास सुरू राहतील असे सीसीटीव्ही लावण्यात यावे, अशाही मागण्या मार्डने केल्या आहेत.