एसटी खासगीकरणासाठी कंपनी नियुक्त; कर्मचारी संपाकडे कानाडोळा करत महामंडळाचा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 19, 2021

एसटी खासगीकरणासाठी कंपनी नियुक्त; कर्मचारी संपाकडे कानाडोळा करत महामंडळाचा निर्णय

https://ift.tt/3cwYYHi
- कर्मचारी संपाकडे कानाडोळा करत महामंडळाचा निर्णय म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्यात ८५ हजार एसटी कर्मचारी आपल्या लेकरांबाळांसह संपात सहभागी झाले असताना महामंडळाने खासगीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. एसटी महामंडळात खासगी गाड्या भाड्याने घेण्यासाठी सल्लागार कंपनी म्हणून केपीएमजीची नियुक्त करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत एसटी कर्मचारी संप मिटवण्यासाठी कोणत्याही उपायांवर सकारात्मक चर्चा झाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषण-संपाचा आज, २३ वा दिवस आहे. हा संप महाराष्ट्राच्या इतिहासातील तसेच महामंडळाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा संप आहे. कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याने अनेक पक्ष, प्रवासी संघटना, संस्था यांनी एसटी संपाला पाठिंबा दर्शवला आहे. राज्यातील कमाईच्या मार्गावर महामंडळाचा खासगी बसगाड्यांच्या मदतीने वाहतूक करण्याचा मानस आहे. त्यामुळे खासगी गाड्या भाड्याने घेतल्यास त्याचा आर्थिक बोजा किती येईल? त्या कोणत्या मार्गावर चालवणे योग्य ठरेल? या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी कंपनीला दीड ते दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार कंपनी अहवाल सादर करेल. या अभ्यासासाठी महामंडळाकडून कोट्यवधी रुपये मोजण्यात आले आहे, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. हे खासगीकरण नव्हे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवणे, उत्पन्नात सातत्य ठेवणे, प्रवाशांना योग्य आणि दर्जेदार सेवा प्रदान करणे यासाठी ही कंपनी नियुक्त केली आहे, असे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.