दापोली : जिल्ह्यात सुरू असला तरी काही कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. अशातच दापोली येथे मात्र एसटी बसवर शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास झाल्याने या संपाला गालबोट लागलं आहे. सुदैवाने या दगडफेकीत कोणीही जखमी झालं नाही. () रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या व तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञात इसमाने एसटी बसवर हा दगड मारला आहे. शनिवारी रात्री ७ वाजून १५ मिनिटांनी खेड येथून सुटलेली दापोली डेपोची एसटी बस सात प्रवासी घेऊन दापोलीकडे निघाली होती. मात्र वाटेतच बसवर दगडफेक करण्यात आली. दापोलीकडे येत असताना टाळसुरे वाकण ते नवानगर दरम्यान ही दगडफेक झाली आहे. यावेळी खेड-दापोली बसमध्ये चालक डी. एस. धोत्रे तर वाहक ए. डी. मुसळे हे कार्यरत होते. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही दापोली पोलीस स्थानकात सुरू आहे. दरम्यान, दापोली एसटी आगारात निलंबित करण्यात आलेल्या १९ कर्मचाऱ्यांपैकी १६ कर्मचारी हजर झाले असून दोन जण गावी गेल्याने ते गावावरून आल्यावर हजर होण्याची शक्यता आहे.