
नवी दिल्लीः आजपासून सुरू होत आहे. अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सत्ताधारी भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारा्ंना व्हीप बजावला आहे. तर विरोधी पक्ष काँग्रेसनेही खासदारांना व्हीप बजावला आहे. विरोधकांनी महागाई, पेगाससह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. यामुळे अधिवेशनात काय काय घडतंय त्याचे अपडेट्स वाचा... - लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची आज सकाळी साडेदहा वाजता होणार - केंद्र सरकार या अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी विधेयक मांडणार - तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकार आज संसदेत विधेयक मांडणार - शेतकरी संघटनांनी एमएसपीवर हमी देणारा कायदा करण्याची मागणी केली आहे - संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार, सरकारच्या अजेंड्यावर २६ विधेयकं