जॅकलीनला 'त्या' गिफ्ट पडणार महागात!; ईडीने दिला मोठा झटका, उद्या दिल्लीत... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 7, 2021

जॅकलीनला 'त्या' गिफ्ट पडणार महागात!; ईडीने दिला मोठा झटका, उद्या दिल्लीत...

https://ift.tt/3y040pU
नवी दिल्ली: अभिनेत्री हिला सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावले असून ८ डिसेंबर रोजी दिल्ली येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीने बजावलेला समन्स पाहता जॅकलीनच्या अडचणी येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. ( ) वाचा: दोनशे कोटींच्या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस हिच्याविरुद्ध ईडीकडून लूकआऊट नोटीस आधीच काढण्यात आली आहे. विदेशात जाण्यासाठी जॅकलीन मुंबई विमानतळावर दाखल झाली असता याच नोटीसच्या आधारावर तिला ताब्यात घेण्यात आले होते व नंतर तिची सुटका करण्यात आली होती. तिथून जॅकलीनची सुटका झाली असली तरी तिच्या अडचणी मात्र तूर्त कमी होणार नाहीत, हे निश्चित असून तिला आता चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. सोमवारी ईडीने जॅकलीनला समन्स बजावले असून चौकशीसाठी ८ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीच्या दिल्ली येथील कार्यालयात जॅकलीनला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. वाचा: काय आहे नेमकं प्रकरण? ईडीने २०० कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी व अन्य सहा जणांविरुद्ध तब्बल सात हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. व जॅकलीन यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले असून या प्रकरणात काही महिन्यांपूर्वी जॅकलीनची चौकशी करण्यात आलेली आहे. आता परत तिची चौकशी केली जाणार आहे. सुकेशने जॅकलीनला ५२ लाख रुपये किमतीचा घोडा आणि प्रत्येकी ९ लाख रुपये किमतीची चार मांजरं गिफ्ट दिली होती. तसेच हिरेजडीत दागिन्यांसह आणखीही महागड्या गिफ्ट जॅकलीनला पोहचल्या गेल्या, असा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. त्याचाच अधिक तपास केला जात असून त्यासाठी जॅकलीनला समन्स बजावले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. वाचा: